By  
on  

‘Choked – Paisa Bolta Hai’ Review : नोटबंदीच्या घटनेच्या पार्श्वभूमिवर आधारित आहे अनुराग कश्यपची ‘चोक्ड’ ही फिल्म

सिनेमा –  चोक्ड – पैसा बोलता है

ओटीटी – नेटफ्लिक्स

दिग्दर्शक : अनुराग कश्यप

कलाकार : सय्यामी खेर, रोशन मॅथ्यू, अमृता सुभाष, राजश्री देशपांडे, उद्य नेने
 

‘पैसा बोलता है’ या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणे पैसा हा या कहाणीचा महत्त्वाचा भाग आहे. ही आहे नेटफ्लिक्स ओरिजीनल फिल्म जी दिग्दर्शित केली आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी. ज्यात आहे किचन ड्राम, जिथे स्वयंपाक घरातील बेसीन सिंग हा महत्त्वाचा भाग.
सरीता पिल्लाई सहस्त्रबुध्दे जी साकारली आहे सय्यामी खेरने, ती एक कंटाळलेली बँक कॅशियर आहे. तिचा पती सुशांत जे साकारला आहे रोशन मॅथ्यू याने तो एक स्ट्रगल करणारा म्युझिशियन आहे. त्यामुळे सरीता एकटी घरातील आर्थिक बाजू सांभाळतेय. त्यांना समीर नावाचा एक मुलगाही आहे जो साकारला आहे पार्थवर शुक्ला याने. मात्र हा परिवार जसा साधा दिसतो तसा नाहीय. सुशांत हा घरीच असतो कारण त्याच्याकडे नोकरी नाही. तर सरीताला गायिका बनायचं होतं, मात्र स्टेजवरच तिचा श्वास गुदमरल्याने त्याचीच भिती तिला सतत असते. थोडक्यात काय तर सरीता आणि सुशांत यांचं नातं तेव्हाचं गुदमरलं जेव्हा या दोघांचं हे स्वप्न नाहीसं झालं होतं.मात्र अगदी छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या परिवाराचं काही अस्तित्त्व नसलेल्या जगण्याला एक वेगळचं वळण मिळालं. मात्र नंतर त्यांच्या बेसिनच्या सिंकने त्यांच्या या आयुष्यात वेगळीच अडचण निर्माण केली. एका रात्री तीन वाजण्याच्या सुमारास सरीता अचानक ड्रेनेज पाईपमधील आवाजाने झोपेतून उठते. ते पाहून सरीता तो पाईप काढून पायपातले घाण पाणी किचनच्या ओट्यावरे फेकते. मात्र तेव्हा असं काही घडतं जे  पाहून ती थक्क होते.  पायपातून एका प्लास्टिक पिशवीत असलेल्या नोटांचे बंडल निघू लागतात. 

नितीन भावे यांच्या स्क्रिनप्ले मधील कुशलता आणि त्यातील गुढ हे अनुराग कश्यपच्या डिमॉनिटायझेशनवर आधारित या ड्रामात पाहायला मिळतं. धक्क्यात असलेली सरीता या भितीत असते की तिला या नोटांच्या पॅकेटसोबत कुणी पाहिलं तर काय होईल. 8 नोव्हेंबर, 2016 रोजी 8 वाजण्याच्या सुमारास आणखी एक मोठा धक्का सरीताला बसतो, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटबंदीवर भाषण करत असतात. विविध स्वप्न रचलेली सरीता यातून कसं बाहेर निघायचा हा मार्ग शोधत असते. या जुन्या नोटांच्या बदल्यात तिला तिचं महागडं स्वप्न बदलायचं नाही. तर दुसरीकडे सुशांत हा आनंदी असतो कारण मोदींच्या भाषणात काळा पैसा समोर आणण्याचं आश्वासन असतं. अनुराग कश्यप यांच्या सिनेमात राजकारण विषयक भाग नेहमीच असतो. मात्र तो या कथेचा मुख्य मुद्दा नाही. फक्त काही ठिकाणी तो थोडक्यात जाणवतो. यात काही शेजारी देखील आहेत जे यात नाक खुपसण्याचं काम करतात. नीता जी साकारली आहे राजश्री देशपांडेने आणि मोठ्याने बोलणारी, हस्तक्षेप करणारी शरवरी ताई जी साकारली आहे अभिनेत्री अमृता सुभाषने. एक अशी आई जी आपल्या मुलीच्या लग्नाची तयारी करते मात्र वेडिंग कॉन्ट्रॅक्टर आणि कॅटरर्सला पैसे देणं तिला महत्त्वाचं वाटत नाही.


आणि हे सगळं पाहिल्यावर लक्षात येतं की चोक्ड हा सिनेमा पैसा, लोभ, राजकारण आणि डिमॉनिटायझेशनचा सामान्य जनतेवर झालेला परिणाम यावर भाष्य करतं. हा सिनेमा हिंदी, मल्याळम आणि मराठी अशा तीन भाषेत प्रदर्शित झाला आहे. सिनेमाप्रतीची प्रामाणीक मेहनत इथे जाणवते.   जर अनुराग कश्यप आणि भावे यांनी नोटबंदीचा विषय क्रिटीक्स प्रमाणे समोर न आणता वेगळ्या पध्दतीने आणला असता तर ते आणखी चांगलं झालं असतं.  सिल्वेस्टर फोन्सेका यांच्या कॅमेऱ्याने शहरात छोट्या जागेत राहणाऱ्या लोकांचं विकृत भय सहज पद्धतिने मांडलय. कार्श काले यांचं संगीत आणि गरिमा ओबराह यांचं गीत यांनी केलेल्या सिनेमाच्या शेवटच्या गाण्यात अनुराग कश्यप टच जाणवतो. पण हा सिनेमा सय्यामी खेरचाच असल्याचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणवतं. ही एक सामर्थ्यवान महिला आहे जी स्वत:च्या गायनाच्या अपयशाचा परिणाम तिच्या आयुष्यावर होऊ देत नाही. तिच्या नॉन ग्लॅम लूकने आणि सहकलाकार रोशन मॅथ्यूच्या सहकार्याने ही भूमिका ती सहज पेलवते. रोशन मॅथ्यूचा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. मात्र अभिनेत्री अमृता सुभाषचा हा बेस्ट परफॉर्मन्स म्हणता येणार नाही. पण अमृताने तिच्या भूमिकेच्या वाट्याला जे आलं ते प्रामाणीकपणे केलं आहे. राजश्री देशपांडे आणि उद्य नेने यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या पध्दतिने निभावल्या आहेत.
चोक्ड हा सिनेमा अनुराग कश्यपचा उत्कृष्ट सिनेमा म्हणता येणार नाही. विशेषकरून तुम्हाला अपेक्षीत नसलेला असा या सिनेमाचा शेवट आहे.   

अनुराग कश्यप हे खऱ्या आयुष्यात नोटबंदी, राजकारण या गोष्टींवर सोशल मिडीयावर बिनधास्त बोलत असतात. त्याप्रमाणे या सिनेमात मात्र नोटबंदीच्या विषयावर खुलून भाष्य केलं नसल्याचं जाणवतं. नोटबंदीच्या विषयावर अनुराग कश्यपच्या सिनेमातून आणखी गोष्टी समोर येणं अपेक्षित होत्या. अनुराग सारख्या बिनधास्त फिल्ममेकर कडून या विषयावर आणखी गोष्टी समोर आणता आल्या असत्या. आणि यामुळेच हा सिनेमा पाहताना थोडी  निराशा होते.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive