By  
on  

पाहा Video : आयुष्मानसोबत इन्स्टाग्राम लाईव्ह करताना रणवीर सिंहला दीपिका कडून पडल्या ओरडा, एक्टर  म्हटला “भाभी डांट रही है”

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर सुरु झाला आहे. यातच मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत.नुकतच सोशल मिडीयाच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये असं काही घडलय की ज्याची सगळीकडे चर्चा सुरु आहे. अभिनेता आयुष्मान खुराना इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांसोबत गप्पा मारत होता. मात्र तेवढ्यातच त्याच्या लाईव्हमध्ये अभिनेता रणवीर सिंह जोडला गेला. रणवीरला लाईव्ह आलेलं पाहून आयुष्मानही आनंदी झाला.

 

यावेळी रणवीर नुकताच झोपेतून उठला असल्याचं त्याने सांगीतलं. मात्र हा संवाद पुढे जाण्याआधीच थांबला. कारण दीपिका रणवीरच्या बाजूलाच होती. रणवीर पुढे म्हटला की, “भाभी डांट रही है कह रही है की मै झूम कॉल पर हूँ चिल्ला मत.”  हे बोलून रणवीरने त्या व्हिडीओमधून एक्झिट घेतली. 
आयुष्मान आणि रणवीरचा हा मजेशीर संवाद आणि त्याचा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. रणवीर सिंह तसा इन्स्टाग्रावर जेव्हा केव्हा लाईव्ह येतो तेव्हा तो काही सेंकड लाईव्ह येऊन पटकन निघून जातो. आणि त्याची ही गंमत त्याच्या चाहत्यांनाही आवडते. आयुष्मानच्या लाईव्ह व्हिडीओमध्येही रणवीरने हेच केले आहे.मात्र बॉलिवुडचे हे दोन उत्तम कलाकार एकत्र लाईव्ह आल्यावर चाहत्यांचं मात्र चांगलच समाधान झालं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive