सुशांत सिंग राजपूतच्या अंत्यदर्शनाला या सेलिब्रिटींनी लावली हजेरी

By  
on  

तरुण अभिनेता सुशांत सिंग राजपूतचं जाणं सगळ्यांनाच चटका लावून गेलं. सुशांत एक हुशार व्यक्ती होता. वाचनाचा उत्तम व्यासंगी होता. त्याचा जाण्याने घरच्यांनाही धक्का बसला आहे. 

 

या तरुण कलाकाराच्या आत्महत्येने बॉलिवूड हळहळलं आहे. आज संध्याकाळी विलेपार्ले स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. 

 

राजकुमार राव, क्रिस्टल डिसुजा, श्रद्धा कपूर, विवेक ओबेराय या कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री पुजा चोप्राही यावेळी दिसली. पुजा यावेळी भावनिक झालेली दिसली.

 

 

 

 

Recommended

Loading...
Share