सुशांतच्या टीमने लाँच केली Selfmusing वेबसाईट, पाहता येतील त्याचा सुंदर आठवणी

By  
on  

बॉलुवूडचा हरहुन्नरी अ‍भिनेता अशी ओळख असलेला सुशांत सिंह राजपूतने अचानक आयुष्यातून एक्झिटचा मार्ग निवडला. त्याचं असं आत्महत्या करणं सर्वांनाच चटका लावून गेलं.  त्याच्या आत्महत्येमुळे सिनेविश्व व चाहते शोकसागरात बुडाले. सुशांतच्या टीम त्याच्या चाहत्यांसाठी एक वेबसाईट लाँच केली आहे. selfmusing.com असं या साईटचं नाव आहे.

 

ही साईट लाँच करताना त्याची टीम म्हणते, ‘तुमच्यासारखे फॅन्सच सुशांतचे खरे गॉडफादर आहेत. त्याने दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी त्याचे विचार, स्वप्न आणि आकांक्षा यांचं भांडार असेल. लोकांनी याबाबत जाणून घ्यावं ही त्याची कायमच इच्छा होती. त्याच्या सकारात्मकतेची इथे तुम्हाला कायमच प्रचिती येत राहील. यासोबतच टीमने #AlwaysAlive चा हॅशटॅगही शेअर केला आहे.

Recommended

Loading...
Share