By  
on  

बिग बींचा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला मदतीचा हात 

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे विविध क्षेत्रांना त्याचा फटका बसला आहे. त्यातच मनोरंजन विश्वाचही काम ठप्प झाल्यानं याचा फटका या क्षेत्रालाही बसला. मनोरंजन विश्वातील कर्मचारी, कलाकार आणि ज्यांचं हातावर पोट आहे अशांना विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या परिस्थितीत मदतीसाठी असंख्य हात पुढे येत आहेत. त्यातच या सगळ्यांच्या मदतीसाठी बिग बी अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहे. 

 बिग बी अमिताभ बच्चन यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला सहकार्य केले आहे. ‘बिग बाज़ार’चे  १५०० रुपयाचे ५०० कूपन्स अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे सुपूर्द केले आहेत. नुकतेच महामंडळाच्या ५०० सभासदांना या कूपन्सचे वाटप करण्यात आले. या कूपन्स अंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

.. in the end nothing but the purity of peace prevails .. embrace it .. !

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan) on

 

या मदतीबद्दल 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी अमिताभ बच्चन यांचे आभार मानले आहेत. अशा परिस्थिती महानायक बिग बी अमिताभ बच्चन नेहमीच मदतीचा हात पुढे करताना दिसले आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive