By  
on  

 आलिया भट्ट ने डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या लाईव्ह कार्यक्रमात ‘सडक-2’चं पोस्टर केलं प्रदर्शित

‘सडक-2’ही 1991मध्ये प्रदर्शित झालेल्या पूजा भट्ट आणि संजय दत्तचा सिनेमा 'सडक'चा सिक्वल आहे. 'सडक' सिनेमाचे दिग्दर्शक महेश भट्ट हेच या सिनेमाचही दिग्दर्शन करत आहेत तर शिवाय भाऊ मुकेश भट्टसोबत ते या सिनेमाची निर्मिती देखील करत आहेत. 

आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूरसोबतच या सिनेमातही पूजा भट्ट आणि संजय दत्त, गुलशन ग्रोवर झळकणार आहेत. हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.
शिवाय सोशल मिडीयावरही हा पोस्टर आलियाने पोस्ट केला आहे. या लाईव्ह कार्यक्रमात आलियाने या सिनेमाविषयी बऱ्याच गोष्टी सांगीतल्या. 

 

यासह 'भुज', 'लक्ष्मी बॉम्ब', 'सडक-2', 'बिग बुल', 'लूटकेस', 'खुदा हाफीज'  या सिनेमांचे पोस्टर या लाईव्ह कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले. शिवाय या सिनेमांविषयी लाईव्हमध्ये उपस्थित कलाकारांनी चर्चा केली. 

Recommended

PeepingMoon Exclusive