अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या रोमॅण्टीक कॉमेडी सिनेमाचं लवकरच मुंबईत शूटींग सुरु होणार

By  
on  

करोना संकटामुळे दोन अडीच महिने संपूर्ण सिनेसृष्टी ठप्प झाली होती. अनेक सिनेमांची गणितं बिघडली.  पण आता अनलॉकमध्ये पुनश्च हरिओम म्हणत हळूहळू कामांना गती देण्यात येतेय व कामांचा श्रीगणेशा होतोय. अर्जुन कपूर  आणि रकुल प्रीत सिंह  ही जोडी लवकरच एका रोमॅण्टीक- कॉमेडी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अद्याप या सिनेमाचं टायटल निश्चित झालेलं नाही.

लॉकडाऊनमुळे या सिनेमाचं शूटींग थांबवावं लागलं होतं.मुंबईतील शेवटचं शेड्यूल बाकी असताना लॉकडाऊनची घोषणा झाली. तर सिनेमाचं शेवटचं शेड्यूल युरोपमध्ये प्लान  करण्यात आलं होतं. पण आता अशा बातम्या येत आहेत, की मेकर्स लवकरच मुंबईत त्याचं उरलेलं शेड्यूल पूर्ण करतील.

 

Recommended

Loading...
Share