आमिर खानच्या घरात करोनाचा शिरकाव, स्टेटमेंट जारी करत दिली माहिती

By  
on  

करोना व्हायरसच्या कचाट्यातून बॉलिवूडकरही सुटलेले नाहीत. त्यांच्याही घरात करोनाचा शिकाव झाल्याचं पाहायला मिळतंय. आमिर खानच्या घरातसुध्दा करोनाची एन्ट्री झाली असून त्याच्या काही स्टाफ मेंबर्सना करोनाची लागण झाली आहे. आमिर खानने ट्विट करत या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

आमिर खान ट्विट करत म्हणतो, "मी तुम्हांला सांगू इच्छितो की माझ्या घरातले काही स्टाफ मेंबर्स हे करोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे समजताच त्यांना आम्ही त्वरित क्वारंटाईन केलं ाहे. तसंच पालिका अधिका-यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत त्यांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यांची योग्य ती काळजी पालिकेतर्फे घेण्यात येतेय. तसंच पालिकेने त्वरित सॅनिटायझेशनचं काम सुध्दा सोसायटीत केल्याने मी त्यांचा आभारी आहे. आम्हा इतर लोकांचेसुध्दा करोना चाचण्या करण्यात आल्या आणि आम्ही त्यात निगेटिव्ह असल्याचे समजतेय. आता मी माझ्या आईची करोना चाचणी करायला जात आहे, तुमच्या सर्वांच्या प्रार्थना पाठीशी असू द्यात व ती सुध्दा या चाचणीत निगेटिव्ह येवो."

 

Recommended

Loading...
Share