चिरतरुण नीना गुप्ता यांनी लॉकडाऊनमध्ये साईन केले तीन सिनेमे

By  
on  

आपल्या लूक्सने या वयातही चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता. आपल्या सदाबहार अभिनयाने त्या प्रत्येक भूमिकांमधून सिनेरसिकांची मनं जिंकतात. 'बधाई हो', 'पंगा' या सारख्या लक्षवेधी सिनेमांमधून त्यांनी महत्वपूर्ण  भूमिका साकारल्या आहेत. या लॉकडाऊनमध्ये त्या उत्तराखंडमध्ये वेळ घालवत आहेत. पण सुट्टी एंजॉय करण्यासोबत त्या सिनेमांच्या स्क्रिप्टही वाचत आहेत.

 

 

एका लिडिंग वेबसाईटशी बोलताना नीना म्हणतात, ‘ मी तीन महिन्यात तीन स्क्रिप्टसना होकार कळवला आहे. या सिनेमाविषयी जास्त बोलणं शक्य नाही. पण त्यातील एक सिनेमा शाद अलीसोबत आहे. मी या प्रोजेक्ट साठी खुप उत्साहित आहे. लवकरच मुंबईला येईन. त्यानंतर कामाला सुरुवात करेन.  साठी पार केलेल्या नीना अनेकदा त्यांचे बोल्ड फोटोही सोशल मिडियावर शेअर करत असतात.

Recommended

Loading...
Share