हे फक्त तुम्हीच करु शकता! भक्तांना ,वारकरी बांधवांना बिग बींनी दिल्या विठ्ठलमय शुभेच्छा

By  
on  

आज आषाढी एकादशी. या दिवशी पंढरपूरात वारक-यांचा अथांग जनसाग लोटतो. तो उत्साह अवर्णनीयच असतो.  वर्षभर वारकरी बांधव वारीची आतुतेने वाट पाहतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या या पावलांना या दरम्यान आपसूकच वेग येतो. पण कधीही न चुकलेली वारी आणि रिंगण सोहळ्यांना यंदा मात्र करोना संकटामुळे खंड पडला. पण मोजक्याच वारक-यांच्या उपस्थित मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक विठ्ठलाची पूजा केली. यंदा प्रत्यक्ष श्री विठ्ठलाचं दर्शन याचि देहि, याची डोळा घेता येत नसलं तरी विठ्ठल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. 

म्हणूनच  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांनी नुकतंच आपल्या सोशल मिडीयावरुन वारकरी बंधूना खास मराठीत आषाढी एकादशीच्या शुभेच्छा द्त सुखद धक्का दिला आहे. आपुलकीच्या आणि मायेच्या शब्दांनी बिग बींनी शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बी तुम्हाला मानलं. हे फक्त तुम्हीच करु शकता. ते म्हणतात, वषयनी #आषाढीएकादशी निमित्त सर्व भाविकांना, भक्तांना ,वारकरी बांधवांना विठ्ठलमय शुभेच्छा !!

 

महाराष्ट्रातला सर्वात मोठा उत्सव आषाढी एकादशीनिमित्त शुभेच्छा देण्याची बिग बींची ही पहिलीच वेळ नाही. तर मागच्यावर्षीसुध्दा त्यांनी  एक अभंग सादर करत भक्तांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

Recommended

Loading...
Share