Covid-19 मुळे ओम राऊत दिग्दर्शित करत असलेल्या कार्तिक आर्यन स्टारर सिनेमाचं शुटिंग लांबलं

By  
on  

‘तानाजी: द अनसंग वॉरिअर’ या सिनेमाचा दिग्दर्शक ओम राऊत आता एका अ‍ॅक्शनपट घेऊन भेटीला येणार असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. या सिनेमाचं शुटिंग पुढं ढकललं असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. पण या सिनेमाचं शुटिंग पुढं ढकललं नाही तर थांबवलं आहे. करोनामुळे या सिनेमाचं शुट थांबवलं आहे. या 3 डी सिनेमाला टी-सिरीज प्रोड्युस करत आहे. या सिनेमाचं बहुतांश शुटिंग परदेशात होणार असल्याने या परिस्थितीमध्ये हे शक्य नाही. या सिनेमाचं शुटिंग हाँगकाँगमध्ये केलं जाणार होतं. 

पण आता ते पुढे गेलं आहे. कार्तिक आगामी दोस्तानाच्या सीक्वेलमध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत आहेत.

Recommended

Loading...
Share