'बेल बॉटम' सिनेमात अक्षय कुमारची नायिका बनणार अभिनेत्री वाणी कपूर

By  
on  

अक्षय कुमारच्या अनेक बहुचर्चित सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'बेल बॉटम'. या सिनेमात अक्षयची नायिका कोण साकारणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता होती. अखेर यावरचा पडदा आज उलगडला गेला. अभिनेत्री वाणी कपूर 'बेल बॉटम' मध्ये अक्षयची नायिका बनणार असल्याच्या वृत्तावर आज शिक्कामोर्तब झालं. 

वाणी कपूर आणि जॅकी भगनानी यांनी वाणी या सिनेमात नायिका साकारत असल्याचं सोशल मिडीयावरुन नुकतंच अधिकृतरित्या जाहीर केलं. यादरम्यान वाणीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

 

अक्षय कुमार या बॉलिवूड सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर करायला मी प्रचंड उत्सुक आहे. तसंच आता मला सिनेमाच्या शूटींगची वाटच बघवत नाही, अशा शब्दात वाणीने आपला आनंद शेअर केला आहे.  

Recommended

Loading...
Share