लग्नानंतर पहिले सहा महिने मी आणि विराट फक्त २१ दिवसच एकमेकांसोबत होतो

By  
on  

अनुष्का आणि विराट हे सेलिब्रिटी कपल हे चाहत्यांचं प्रचंड लाडकं आहे. अनेकांसाठी ते कपल गोल्स सेट करतात. क्रिकेट आणि सिनेविश्वाचा हा अनुष्का व विराटचा मिलाफ सर्वांनाच खुप आवडतो. आपापासातील सामंजस्य हेच त्याचं नात्याचं रहस्य आहे हे कोणापासूनच लपून राहिलेलं नाही. कितीही बिझी शेड्यूल असू  दे दोघंही एकमेकांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी वेळ हा काढतातच. 

आता तर लॉकडाऊनमुळे हे लव्हबर्ड्स पूर्णवेळ एकमेकांसोबत होते आणि धम्माल फोटो-व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करत होते. पण या दोघांनी अनेक इंटरव्ह्यूमध्ये आम्हा दोघांना एकमेकांसोबत खुप कमी वेळ मिळतो याबद्दल सांगितलं होतं. 

 

एका मुलाखतीत अनुष्का म्हणाली, लग्नानंतर मी आणि विराट पहिल्या सहा महिन्यात फक्त २१ दिवसच एकमेकांसोबत होतो. आमच्या वर्क कमिट्मेंट्मुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळ देता येत नव्हता. जेव्हा मी आणि विकाट भेटायचो तर लोकांना ते व्हेकेशन वाटायचं. पण तसं नव्हतं, तर आमच्यासाठी तो खुप मौल्यवान वेळ होता आणि हे दिवस मी मोजले आहेत. 

Recommended

Loading...
Share