By  
on  

टिक टॉक स्टार आमीर सिद्दीकीला ‘बिग बॉस 14’ चा स्पर्धक होण्याची ऑफर

हिंदी बिग बॉसच्या 14 सीझनची तयारी सुरु झाली आहे. या शोचा 13 वा सीझन यशस्वी ठरला होता. आता आगामी सीझनची नांदी झाली आहे. आता या सीझनच्या स्पर्धकांच्या नावाचे अंदाज बांधले जात आहेत. यामध्ये टिक टॉकस्टार आमीर सिद्दीकीचं नावही चर्चेत आहे. आमीरभोवती असलेलं वादाचं वलय पाहता त्याला या शोची ऑफर आल्याचं समजतं. अजून आमीरचं यावर काय उत्तर आहे हे समजू शकलेलं नाही. 

 

 

भारत सरकारने अलीकडेच टिक टॉकवर बंदी घातली आहे. आमीर याचे टिक टॉकवर 3.8 मिलियन फॉलोवर्स होते. आमीरला युट्युबर कॅरी मिनाटीने रोस्ट केलं होतं. तेव्हापासून तो जास्त चर्चेत आला.

Recommended

PeepingMoon Exclusive