बॉलिवूडला आपल्या तालावर नाचवणा-या प्रसिध्द कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन

By  
on  

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे.. १७ जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्यानं त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. 

मागील काही दिवसांपासून सरोजजी या श्वास घेण्यात अडथळ्या येत असल्याने रुग्णालयातच उपचार घेत होत्या. यादरम्यान त्यांची करोना चाचणीसुध्दा करण्यात आली. त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. 

गेल्या बऱ्याच काळापासून त्या वृध्दापकाळामुळे बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट कलंक आणि कंगना रणोतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात त्यांनी गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या दिग्गज कोरिओग्राफर होत्या. पूर्ण बॉलिवूडला त्या आपल्या तालावर नाचवायच्या .  एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या माधुरी दक्षितवर चित्रित झालेल्या  गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या सुपरहिट  गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं.बॉलिवूडकर सरोजजी यांना मास्टरजी म्हणूनच हाक मारायचे. 

Recommended

Loading...
Share