Throwback: जेव्हा सरोज खान यांना इंडस्ट्रीत काम मिळत नव्हतं , तेव्हा लाभली होती सलमानची साथ

By  
on  

बॉलिवूडच्या ज्येष्ठ कोरिओग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. बरेच दिवस त्या श्वसनाच्या त्रासाने रुग्णालयात दाखल होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७२ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून सरोजजींच्या आठवणींत सर्व कलाकार बुडाले आहेत. 

सरोज खान यांनी तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलीय. तरीही एक काळ असा होता, जिथे काम न मिळत असल्याने त्या आर्थ अडचणीत सापडल्या होत्या. सरोज खान यांना काम मिळत नसल्याच्या बातम्या सलमानला मिळाल्यानंतर ताबडतोब सलमानने त्यांची भेट घेऊन आपल्या आगामी सिनेमासाटी सरोज खान यांना कोरिओग्राफी करण्यास सांगितली. 

 

सरोज खान यांनी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. १९७४ मध्ये ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्यांनी आतापर्यंत २ हजारांपेक्षा अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत. तसंच सरोज खान यांना आतापर्यंत ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं आहे. काही चित्रपटांमध्ये त्यांनी लेखक म्हणूनही काम केलं होतं.

Recommended

Loading...
Share