आणि सरोज खान यांनी दिला होता बिग बींना एक रुपायाचा शगुन, वाचा किस्सा
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचं आज निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झाल्याचं सांगण्यात येतं. वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सरोज यांच्या निधनामुळे सेलिब्रिटी आठवणी शेअर करून दु:ख व्यक्त करत आहेत. बिग बींनीही सरोजजींची खास आठवण सोशल मिडियावर शेअर केली आहे. सरोजजी उत्तम डान्स करत असलेल्या कलाकाराला शगुन म्हणून एक रुपया द्यायच्या.
बिग बी म्हणतात, ‘मलाही असा शगुनचा एक रुपाया मिळाला होता. मी खरं तर उत्तम डान्स करत नाही. पण त्यांनी दिलेला हा शगुन मला कायमच प्रोत्साहन देत आला आहे. आपल्या पोस्टमध्ये पुढे ते म्हणतात, ‘सरोजजी तुमच्या जाण्याने बॉलिवूडचा रिदम, स्टाईल आणि ग्रेस हरवली आहे.’ यासोबतच अनेक कलाकारांनी सरोजजींना श्रद्धांजली वाहिली आहे.