करोना संकटामुळे प्रार्थना सभेचं आयोजन नाही: सरोज खान यांच्या मुलीचं स्टेटमेंट जारी

By  
on  

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७२ वर्षी जगाचा निरोप घेतला. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाले आहे. सरोज खान यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळीच मलाड येथील दफनभूमीत आज सकाळीच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सरोज खान यांच्या अंत्यसंस्कारासाठी काही नातेवाईक आणि परिवारातील सदस्यच उपस्थित होते. संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरल्यानंतर प्रत्येक कलाकार सरोजजींच्या आठवणींना उजाळा देत आहे. काही वेळापूर्वीच सरोज खान यांच्या लेकीने त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक पोस्ट केली. त्यात तिने सरोज खान यांच्या आठवणीत कोणत्याही प्रार्थना सभेचं करोना संकटाच्या पा्श्वभूमीवर आयोजन करण्यात येणार नसल्याचं सांगितलं आहे. 

 

Recommended

Loading...
Share