सरोज खान माधुरीसोबत थिरकल्या ‘एक दो तीन’वर , पाहा थ्रोबॅक व्हिडीओ

By  
on  

माधुरी सरोज खान यांच्या सर्वात आवडत्या विद्यार्थ्यांपैकी एक होती. ‘एक दो तीन’ हे गाणं माधुरीच्या करिअरमधील  सुपरहिट गाणं होतं. या गाण्याची कोरिओग्राफी सरोज खान यांनी केली होती. माधुरी आणि सरोजजी यांच्यात मास्टरजी आणि शिष्य असं जरी नातं असलं तरी दोघीही खुप घट्ट मैत्रिणीसुध्दा होत्या. सरोजजींच्या निधनानंतर मी उध्द्वस्त झालेय, अशा आशयाची पोस्ट माधुरीने ट्विटरवर केली आहे. 

 दरम्यान सरोज खान यांचा अभिनेत्री माधुरी दिक्षितसोबत डान्स करतानाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्या ‘एक दो तीन’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहेत.माधुरीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात शिक्षक दिनाच्या निमित्ताने हा व्हिडीओ शेअर केला होता. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी माधुरी त्यांच्या घरी गेली होती. त्यावेळी दोघी ‘एक दो तीन’ या गाण्यावर थिरकल्या व सिनेमातील गाण्यांच्या शूटींगच्या आठवणींना उजाळा दिला होता. 

 

आज त्यांच्या निधनानंतर हा थ्रोबॅक व्हिडीओ खुप  चर्चेत आला आहे.   सरोजजी बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर होत्या. पण २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं

 

 

 

 

सरोज खान यांनी आपल्या कारकिर्दीत मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू या सुपरहिट सिनेमांसाठी कोरिओग्राफी केली.

Recommended

Loading...
Share