पुढल्या वर्षी प्रदर्शित होणार अजय देवगणचा 'मैदान' , 13 ऑगस्ट 2021 ठरली प्रदर्शनाची तारीख

By  
on  

लॉकडाउन आणि कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजन विश्वात बरीच उलथा पालथ झाली. प्रदर्शनाच्या मार्गावर असलेल्या काही सिनेमांना प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली तर काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. 

अजय देवगणचा आगामी सिनेमा याच वर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता होती. मात्र आता चक्क या सिनेमाचं प्रदर्शन पुढल्या वर्षी ढकलण्यात आलं आहे. नुकतीच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख घोषीत करण्यात आली. 13 ऑगस्ट 2021 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

 

एक असा सिनेमा जो वर्ल्ड फुटबॉल विषयी आहे. हा सिनेमा 1950 ते 1963 कालावधीत भारतीय फुटबॉल टीमचे मॅनेजर आणि कोच असलेल्या सैयद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. या सिनेमात अब्दुल रहीमच्या भूमिकेत अजय देवगण झळकणार आहे.

या सिनेमात अजय देवगणसह प्रियामणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष देखील आहेत. झी स्टुडिओज, बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुनवा जॉय सेनगुप्ता यांची निर्मिती आहे. 

Recommended

Loading...
Share