पाहा Video : लॉकडाउनमध्ये कंगना रनौतने परिवारासोबत प्लॅन केली पिकनिक 

By  
on  

लॉकडाउनच्या आधीपासूनच कंगना तिच्या परिवारासोबत मनालीमधील तिच्या घरी आहे. कंगनाची टीम तिच्या सोशल मिडीया टीम अकाउंटवरून तिचे मनालीमधील परिवारासोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकताच तिच्या टीम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत कंगना तिच्या परिवारसोबत वेळ घालवत असल्याच पाहायला मिळतय. परिवारासोबत कंगना पिकनिकचा आनंद लुटत असल्याचं पाहायला मिळतय. तिचा भाचा पृथ्वी, बहिण रंगोली आणि परिवारासोबत कंगणा धमाल करतेय.
कंगनाच्या टीमने हा व्हिडीओ शेयर करून लिहीलय की, “कंगना ने तिच्या परिवारासोबत पिकनिक आयोजीत केली होती. लॉकडाउनमुळे व्हॅलीमध्ये कुणीच पर्यटक नाहीत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्य आणि आनंदी वेळ घालवता आला जो त्यांना याआधी मिळाला नव्हता.”

कंगनाची बहिण रंगोली चांदेलनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या पिकनिकचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहे. “आमच्या पालकांच्या सांगण्यावरून कंगनाने परिवारासाठी पिकनिक प्लॅन केली. पावसाळ्या आधी त्यांना उन्हाळ्याची मजा लुटायची होती. मात्र ग्रीन झोनमध्ये असतानाही आम्हाला परवानगीसाठी मोठी प्रोसेस करावी लागली. आमची मदत करण्यासाठी हिमाचलच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे धन्यवाद. ही एक महत्त्वाची आउटिंग होती. मनाली ग्रीन झोनमध्ये आहे. परंतु कोरोनामुळे मनाली पूर्णपणे रिकामं आहे. ज्यामुळे ते अतिशय सुंदर आणि छान दिसतय.”
अशाप्रकारे कंगनाने तिच्या परिवारासोबत निसर्गाचा असा मनसोक्त आनंद लुटल्याचं या व्हिडीओ आणि फोटोंमधून पाहायला मिळतय.
 

Recommended

Loading...
Share