यूट्यूब स्टार प्राजक्ता कोळीने शेयर केला डेब्यू फिल्म 'ख़याली पुलाव' चा ट्रेलर

By  
on  

यूट्यूब सेन्सेशन प्राजक्ता कोळी ने तिचा डेब्यू सिनेमा 'ख़याली पुलाव' चा ट्रेलर सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या सिनेमात प्राजक्ता एका शाळेतील मुलीची भूमिका साकारत आहे. जी स्पोर्ट्समध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहे. तिला तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत मात्र तिच्या आसपास असणाऱ्या लोकांना वाटतं की ती स्पोर्ट्समध्ये काही करू शकणार नाही.
या सिनेमात प्राजक्तासोबत अभिनेता यशपाल शर्मा हे शाळेतील स्पोर्ट्स शिक्षकाच्या भूमिकेत आहेत.

प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या या सिनेमाचा ट्रेलर पोस्ट केला आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, “खूप प्रेमाने हा सिनेमा बनवला आहे. 9 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. ट्रेलर कसा वाटला ? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियेसाठी उत्सुक आहे. सांगा.” 
य़ा सिनेमाचं दिग्दर्शन तरुण डुडेजा यांनी केलं आहे. 9 जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात यशपाल शर्मा, गीता शर्मा, प्रियांका शर्मा, अनुष्का शर्मा, प्रिन्स बजाज आणि सुनील चिटकारा हे देखील झळकणार आहेत.

Recommended

Loading...
Share