By  
on  

रणवीर सिंहला आदिनाथने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, '83' गँगचे फोटो केले पोस्ट

बॉलिवुडमध्ये एनर्जीचा धमाका म्हणून ओळखला जाणाऱ्या रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. सोशल मिडीयावर तर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. '83' हा त्याचा आगामी सिनेमा येत आहे. भारतीय क्रिकेट वर्ल्ड कप विजयावर हा सिनेमा आधारित आहे.ज्यात रणवीर पूर्व क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका साकारतोय. या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील हे दोन मराठमोळे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday @ranveersingh ! Keep shining keep inspiring bro ! Love

A post shared by Addinath M Kothare (@adinathkothare) on

 

रणवीरच्या वाढदिवासानिमित्त अभिनेता आदिनाथने त्याच्यासोबतचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. सोबतच 83 सिनेमातील इतर कलाकारांसोबतचा फोटोही यात जोडला आहे. "अशीच प्रेरणा देत राहा", असं म्हणत त्याने रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर यांच्यासह कित्येक कलाकारांनी आज रणवीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

'83' या सिनेमात आदिनाथ दिलीप वेंगसरकर आणि चिराग पाटील हा वडिल संदीप पाटील यांची भूमिका साकारत आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive