By  
on  

रणबीर कपूर, रिद्धिमा, करण जौहरने असा सेलिब्रेट केला नीतू कपूर यांचा 62वा वाढदिवस

काल अभिनेत्री आणि ऋषी कपूर यांच्या पत्नि नीतू कपूर यांचा 62वा वाढदिवस होता. आणि या वाढदिवसानिमित्ताने मुलगा रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर आणि इतर मित्रपरिवाराने मिळून नीतू कपूर यांचा वाढदिवस साजरा केला. इन्स्टाग्रामवर नीतू यांनी वाढदिवसाचे काही खास क्षण पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये रणबीर, रिद्धिमा, रीमा जैन आणि करण जौहरही पाहायला मिळत आहे.

 नीतू कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत. त्या या पोस्टमध्ये लिहीतात की, “अमीर ते असतात ज्यांचे नातेसंबंध चांगले असतात, आपल्या सगळ्यांना आपल्या जवळच्यांचं प्रेम, सपोर्ट आणि शक्ति हवी असते. मी आज सगळ्यात अमीत असल्याचं मला जाणवतय.”
 शिवाय त्यांना काल सिनेसृष्टीतील जवळच्या मित्रपरिवाराने, चाहत्यांनी सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive