‘मणिकर्णिका’ च्या रुपातली बाहुली आली बाजारात, कंगना म्हणते....

By  
on  

कंगना राणावतची मुख्य भूमिका असलेला मणिकर्णिका हा सिनेमा मागील वर्षी जानेवारीमध्ये रिलीज झाला होता. झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या पराक्रमावर हा सिनेमा बेतला होता. प्रेक्षकांनीही या सिनेमाचं भरभरुन कौतुक केलं आहे. या सिनेमाच्या नावानेच कंगनाने तिच्या प्रॉडक्शन हाऊसचं नाव पण मणिकर्णिका केलं होतं. या सिनेमातील तिच्या लूकशी मिळत्या जुळत्या बाहुल्या बाजारात आल्या आहेत.

 

 

कंगनाने मणिकर्णिका मध्ये केला होता अगदी तसाच हुबेहूब दागिने आणि साजशृंगार या बाहुलीवर दिसत आहे. कंगनानेही याबाबत ट्वीट केलं आहे. यामध्ये ती म्हणते, ‘मणिकर्णिका डॉल मुलांची आवडती बनताना दिसत आहे. मुलं जेव्हा त्यांच्या ख-या नायकांविषयी शिकतात. तेव्हा देशभक्ती आणि धाडस हे गुण त्यांच्यात आपोआपच येतात.  कंगना आजकल नेपोटिझमवरील तिच्या प्रतिक्रियांमुळेही चर्चेत असते. अलीकडेच पुजा भट्टसाठी तिने केलेल्या ट्वीट्सनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं

Recommended

Loading...
Share