पती अभिषेकच्या वेबसिरीजचा ट्रेलर पाहून अशी होती पत्नी ऐश्वर्या बच्चनची प्रतिक्रिया

By  
on  

अभिषेक बच्चन ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिरीजच्या माध्यमातून तो वेबपदार्पणही करतो आहे. या सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून ऐश्वर्याच्या प्रतिक्रियेबाबत अभिषेक नुकताच बोलला.  एका साईटशी बोलताना तो म्हणतो, ‘‘कुटुंबातील सर्वांना ‘ब्रीद : इन टू द शॅडोज’ चा ट्रेलर आवडला. ट्रेलर पाहून ऐश्वर्या भावूक झाल्याचे तिने सांगितले. माझ्या कुटुंबियांना ट्रेलर आवडला आहे आता ते सीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

SHINE ON BABY BREATHE...

A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb) on

 

सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर ‘Breathe: Into The Shadows' Abundantia एंटरटेनमेंट द्वारा प्रोड्युस केलं जात आहे.  इन्सपेक्टर कबीर सावंतच्या लूकमध्ये अभिनेता अमित साध दिसतो आहे. याशिवाय सय्यामी खेरची महत्त्वाची भूमिका आहे. ही सिरीज 10 जुलैला म्हणजे आज प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

Recommended

Loading...
Share