प्रभास आता करणार पुजा हेगडेसोबत रोमान्स, ‘राधे श्याम’ सिनेमाचं पोस्टर आलं समोर

By  
on  

प्रभास आणि पुजा हेगडे स्टारर राधे श्याम सिनेमाचं पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरवर प्रभास आणि पुजा दोघंही प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. टीसीरीज, कृष्णम राजू, वामसी, प्रमोद आणि प्रसीदा हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत.प्रभासने सुट घातला आहे तर पुजा लाल ड्रेसमध्ये दिसते आहे. हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

 

 

राधा कृष्ण कुमारने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. हा सिनेमा हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे. यापुर्वी प्रभास  साहो सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात त्याच्यासोबत श्रद्धा कपूर होती. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

Recommended

Loading...
Share