By  
on  

क्रिटीकल केयर सर्व्हीसेसमधील डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत कोरोनाची लागण झालेले बिग बी

बिग बी अमिताभ बच्चन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांनीआज  रात्री 9 वाजून 48 मिनीटांनी नानावटी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. आणि ते आता आय सी यूमध्ये क्रिटीकल केयर सर्व्हिसेसचे डायरेक्टर  डॉ. अब्दुल एस अन्सारी यांच्या निरीक्षणाखाली आहेत. अमिताभ बच्चन यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटलने या सिनियर डॉक्टरना नियुक्त केलं आहे.

याशिवाय 77 वर्षांच्या बिग बींच्या इतरही चाचण्या केल्या जात आहेत. त्यांना जास्त संसर्ग झाला नसून त्यांच्या मागील मेडीकल  इतिहास लक्षात घेता त्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

बच्चन यांना किडनीचा त्रासही होता. आणि आता तीन डॉक्टरांची टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. जेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा त्यांची ऑक्सिजन पातळी कमी असल्याचं समोर आलं होत.

 

Recommended

PeepingMoon Exclusive