By  
on  

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’मधील रोमँटिक गाणं ‘तारे गिन’ची झलक प्रदर्शित 

फिल्म ‘दिल बेचारा’मधील दुसरं गाणं उद्या प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. ‘तारे गिन’ असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याचं संगीत जे तुमच्या ह्दयाला स्पर्श करेल आणि सुशांतचं हास्य ज्याने हद्य पिळवटून निघेल.  या गाण्याची छोटीशी झलक नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे.
या गाण्याची झलक रिलीज करत दिग्दर्शक मुकेश छाबरा ने लिहीलं की, “तुम्ही प्रेमाच्या गाण्याशिवाय प्रेमकहाणी बनवू नाही शकत. संगीत हा प्रेमकथेतील महत्त्वाचा हिस्सा असतो. कॉलेजचं वातावरण लक्षात घेता या गाण्याचं चित्रण साध्या पध्दतीने केलं आहे जेणेकरून हे गाण्यात खरेपणा दिसेल आणि सुंदरही वाटेल.”

या गाण्याचं चित्रीकरण जमशेदपुरमधील एका कॉलेजमध्ये झालं आहे. मोहित चौहान आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गालं असून गाण्याला ए आर रहमान यांचं संगीत लाभलय.  
काही दिवसांपूर्वी ‘दिल बेचारा’ मधील टायटल साँग ‘दिल बेचारा फ्रेंड जोन का मारा’ सुशांतचा डान्स पाहिला होता, हे गाणंही त्याच्या चाहत्यांना आवडलं. मुकेश छाबडा या सिनेमातून दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
 
 ‘दिल बेचारा’ हा सिनेमा येत्या 24 जुलै रोजी डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल 

Recommended

PeepingMoon Exclusive