By  
on  

Watch 'Taare Ginn' : ‘दिल बेचारा’मधील सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघीचं रोमँटीक गाणं ‘तारे गीन’ प्रदर्शित

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ट्रेलरमध्ये सुशांतला पाहून कित्येक जण भावूक झाले होते. आता या सिनेमाची गाणी प्रदर्शित करण्यात येत आहेत. ‘दिल बेचारा’चं टायटल ट्रॅक रिलीज केल्यानंतर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि आता सुशांत आणि संजना सांघीचा यंग लव्ह रोमान्स दाखवणारं दुसर गाणं ‘तारे गीन’ रिलीज करण्यात आलं आहे.

गायक मोहीत चौहान आणि श्रेया घोषालने हे सुंदर गाणं गायलं आहे. या गाण्यात सुशांतने साकारलेला मॅनी आणि संजनाने साकारलेली किझी यांच्या प्रेमाच्या भावना पाहायला मिळत आहेत. ए आर रहमान यांनी हे गाणं कम्पोज केलं आहे. तर अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याची गीत लिहीले आहे.
‘दिल बेचारा’ हा सिनेमा डिज्ने प्लस हॉटस्टारवर येत्या 24 जुलैला प्रदर्शित होणार आहे. फॉल्ट इन अवर स्टार्सचा हा हिंदी रिमेक आहे. 
 

Recommended

PeepingMoon Exclusive