सलमान खान आणि विकी कौशलने कतरिना कैफला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

By  
on  

बॉलिवुडची ग्लॅम गर्ल कतरिना कैफ आता 37 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 
लॉकडाउनच्या काळातही कतरिनाचा वाढदिवस खास ठरलाय कारण कलाविश्वातील कित्येक कलाकारांनी सोशल मिडीयावर पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा पाठवल्या आहेत. कतरिना कैफचा कथित बॉयफ्रेंड म्हणून सध्या चर्चेत असलेल्या विकी कौशलनेही कतरिनाला सोशल मिडीयावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कतरिनाचा एक आनंदी फोटो पोस्ट करून त्याले तिला विश केलं आहे. विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठी सोबतच्या त्याच्या ब्रेकअपनंतर त्याचं नाव कतरिनासोबत जोडलं जात आहे.


मात्र एका पोस्टने सगळ्यांचच लक्ष वेधलं. ती पोस्ट म्हणजे दबंगमिया सलमान खानची. सलमान आणि कतरिनाची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन दोन्ही केमिस्ट्री कित्येकांना आवडते. तेव्हा सलमाननेही कतरिनाला सोशल मिडीयावर पोस्ट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. टायगर जिंदा है सिनेमातील दिल दिया गल्ला या गाण्यातील हा फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोतही दोघांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळतेय. हॅपी बर्थडे कतरिना असा मेसेज लिहून त्याने ट्विटर आणि इस्टाग्रामवर ही पोस्ट केली आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happy bday Katrina . . @katrinakaif

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

 कतरिनाच्या आगामी 'सुर्यवंशी' या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सिनेमात कतरिना आणि अक्षय कुमार ही जोडी बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकत्र दिसेल.  शिवाय अली अब्बास जाफरच्या आगामी सुपरहीरो फिल्ममध्येही कतरिना झळकणार आहे.    
 

Recommended

Loading...
Share