धकधक गर्लने शेयर केली ही जुनी आठवण, पाण्यात अशी केली होती मस्ती

By  
on  

लॉकडाउनच्या काळात सोशल मिडीयावर विविध सकारात्मक संदेश आणि थ्रोबॅक फोटो पोस्ट करण्याचा ट्रेंड पाहायला मिळतोय. यातच धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने सोशल मिडीयावर चांगलीच सक्रिय आहे. या दरम्यान विविध सकारात्मक पोस्ट माधुरीने केल्या

माधुरीने नुकतेच तिचे काही थ्रोबॅक फोटो पोस्ट केले आहेत. यात ती पाण्यात खेळताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये माधुरी लिहीते की, "मला पुन्हा घेऊन जा, या लॉकडाउनचा वेळ काहीतरी वेगळं अनुभव घ्या आणि नव्या गोष्टी शिका, जेवण बनवा, कोडी सोडवा आणि जेव्हा जग उघडेल तेव्हा नेहमी निवड करायला शिका."

 

या पोस्टमधून काहीतरी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न माधुरीने केलाय. शिवाय नृत्याव्यतिरिक्त गायनाची आवड आणि कला माधुरी लॉकडाउनमध्ये जोपासत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कँडल ही तिचं स्वत:चं सिंगलही तिने या लॉकडाउनमध्ये रिलीज केलं.
 

Recommended

Loading...
Share