अक्षय कुमार, धनुष आणि सारा अली खान यांचा सिनेमा ‘अतरंगी रे’चं शुटिंग ऑक्टोबरमध्ये होणार सुरु

By  
on  

आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’मध्ये साउथ स्टार धनुष, अक्षय कुमार आणि सारा अली खान हे कलाकार असल्याची  घोषणा झाली आहे तेव्हा पासून याची चर्चा सुरु आहे. मार्चमध्ये लॉकडाउनच्या आधी या सिनेमाचं चित्रीकरण झालं होतं. या सिनेमाचं पहिलं शेड्युल वाराणसीमध्ये चित्रीत झालं होतं. आणि आता पुन्हा सिनेमांचं चित्रीकरण सुरु होत असताना मेकर्स दुसऱ्या शेड्युलची तयारी करत आहेत. या सिनेमाचं दुसरं शेड्युल मदुराईमध्ये ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल. 
देशात कोरोनाचं वाढतं संकट असताना आनंद एल राय आणि टीमने सुरक्षिततेच्या दृष्टीने चित्रीकरणाची घाई न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सिनेमाच्या पुढील शेड्युलबद्दल बोलायचं झालं तर ऑक्टोबरमध्ये मदुराई आणि त्यानंतर दिल्ली आणि मुंबईतही या सिनेमाचं चित्रीकरण होणार आहे. असं बोललं जातय की अक्षय कुमारसोबत दिल्ली आणि मुंबईचं शेड्युल हे एक महिन्यांपेक्षा जास्त वेळ चालणार आहे. 
आनंद एल राय आणि अक्षय मिळून प्रेक्षकांसाठी असं काही घेऊन येत आहे जे प्रेक्षकांनी याआधी पाहिलं नसेल. 


याविषयी बोलताना आनंद म्हटले की, “लॉकडाउनच्या काळात मी अतरंगी रे चे पुढील शेड्युलची बरीच तयारी केली. मी पुढील शेड्युल सुरु करण्यासाठी खूप उत्सुक आहे. हे शेड्युल ऑक्टोबरमध्ये मदुराई आणि नंतर सुरक्षिततेची काळजी घेऊन अक्षयसोबत दिल्ली आणि मुंबई मध्ये एक महिना असेल.”
अक्षयच्या आगामी सिनेमांविषयी बोलायचं झालं तर त्याच्याकडे ‘सूर्यवंशी’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘बेलबॉटम’, ‘बच्चन पांडे’ आणि ‘पृथ्वीराज’ हे सिनेमे आहेत. ‘सूर्यवंशी’ मध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफ अशी जोडी पाहायला मिळणार आहे. तर ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षय शिवाय कियारा अडवाणीदेखील असेल. 

 

Recommended

Loading...
Share