अंकिता लोखंडे म्हणते, 'सुशांत कधीच नैराश्येने ग्रस्त नव्हता, त्याचं आपण हिरो म्हणूनच स्मरण करुया'

By  
on  

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आता दीड महिना उलटून गेला आहे. आणि त्याच्या आत्महत्येच्या या प्रकरणाच्या चौकशीला, तपासाला चांगलाच वेग मिळाला आहे. तेव्हा लवकरच दोषींना शिक्षा होईल अशी आशा व्यक्त होत आहे. अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघं जास्त कालावधीसाठी म्हणजेच जवळपास ७ वर्ष एकमेकांसोबत रिलेशशीपमध्ये होते. सुशांतच्या निधनानंतर अंकिताने त्याच्या कुटुंबियांची सात्वनपर भेटही घेतली.

दरम्यान, त्याला कोण सतावत होतं का.. त्याला कुठला दबाव होता का अशा अनेक प्रश्नांचा पाढा  रोज  गिरवला जातोय. अशातच सुशांतच्या वडीलांनी पटना येथे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे या प्रकरणाला चांगलच वळण आहे.  त्यावर अंकिता लोखंडेने ट्विटकरून   देखील आपलं मत मांडलं आहे. या तिच्या ट्विटला बराच अर्थही आहे. ती म्हणते विजय सत्याचाच होतो. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंकिचा लोखंडेने पहिल्यांदाच सुशांतच्या आत्महत्येनंतर आपलं मौन सौडलं आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीला तिने नुकतीच मुलाखत दिली. सुशांतला उद्देशून नैेराश्य हा शब्द वापरणं म्हणजे खुप खुप हद्य पिळवटून टाकणारी अशी ही गोष्ट आहे. तो आयुष्यात असा कधीच वागला नव्हता. तो नेहमीच हिरोसारखा राहिला. तो हिरो होता आणि  हिरोच राहील. असं अंकिता सांगते. ती म्हणते, त्याचं आपण हिरो म्हणूनच नेहमी स्मरण करुया. सुशांतला जोडून नैराश्य हे शब्द खुप वेदनादायी ठरतात. 

 

अंकिता पुढे स्पष्ट करते, सुशांत नेहमी लहान-लहान गोष्टींमध्ये आनंद शोधायचा. कधीच त्याच्यावर यश किंवा अपयशाचा परिणाम व्हायचा नाही. तो कधीच नैराश्येने ग्रस्त नव्हता. त्याला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्याचा छंद होता. तो खुप क्रिएटिव्ह होता. तो मला नेहमी म्हणायचा, जर काहीच झालं नाही तर मी माझी शॉर्ट फिल्म बनवेन.

Recommended

Loading...
Share