By  
on  

मुलगा अबरामचा हा फोटो पोस्ट करून किंग खानने दिल्या ईदच्या शुभेच्छा

किंग खान शाहरुख खान तसा सोशल मिडीयावर कमी सक्रिय असतो. मात्र सण उत्सवाला तो आवर्जुन त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतो. ईदच्या निमित्तानेही शाहरुखने त्याच्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नुकतच शाहरुखने मुलगा अब्राम खानचा फोटो सोशल मिडीयावर पो स्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहरुख लिहीतो की, "सगळ्यांना ईद मुबारक. हा दिवस खरतर सगळेच दिवस शांती, आनंद आणि निरोगी आरोग्य सगळ्यांना लाभो. सगळ्यांना स्वत:ला मिठी मारा."

 

सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत एकमेकांना मिठी मारणं शक्य नसल्याने स्वत:लाच मिठी मारण्याचा संदेश शाहरुख य़ा पोस्टमध्ये देत आहे. शिवाय अबरामचा ब्लॅक एन्ड व्हाईट फोटोही चाहंत्यांना आवडला आहे.

लॉकडाउनच्या काळात बॉलिवुड स्टार्सने केलेल्या ऑनलाईन कॉन्सर्टच्या व्हिडीओतही अबराम शाहरुखसोबत झळकला होता. त्यावेळी शाहरुखने गाणं गायलं होत. अधूनमधून अबरामचा अपिअरन्स पाहायला मिळतो. कधी शाहरुख चाहत्यांना भेटण्यासाठी घराच्या बालकनीत येतो तेव्हाही तो बराचवेळा अबरामला सोबत घेऊन आला आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive