करीना कपूरने रणबीर आणि इतर भावंंडांसोबत साजरी केली रक्षाबंधन, आलिया आणि तारा सुतारीयाही उपस्थित

By  
on  

देशभरात आज रक्षाबंधन सण साजरा केला जात आहे. भावा बहिणीच्या गोड नात्याच्या सेलिब्रेशनचा हा उत्सव असतो.  बॉलिवुड कलाकारांनीही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा सण उत्साहात साजरा केला. दरवर्षीप्रमाणे कपूर परिवारही या सणासाठी एकत्र जमले. प्रत्येक सण उत्साहात साजरा करणारा कपूर परिवार रक्षाबंधनाचा सणही साजरा करतात.

नुकतच अभिनेत्री करीना कपूरने इन्स्टाग्रामवर रक्षाबंधनाचे खास क्षण पोस्ट केले आहेत. या निमित्ताने कपूर परिवार एकत्र जमला होता. या फोटोंमध्ये करीना कपूर खान, सैफ अली खान, मुलगा तैमुर, नितू कपूर, रिद्धीमा कपूर साहनी, रणबीर कपूर, रणधीर कपूर, अगस्त्या नंदा, आदार जैन उपस्थित होते. शिवाय रणबीर कपूरची गर्लफ्रेंड आलिया भटही या गेटटुगेदरमध्ये सहभागी झाली होती. आदार जैनची कथित गर्लफ्रेंड असलेली तारा सुतारियाही या फोटोंमध्ये दिसत आहे. मात्र यावर्षी करिश्मा कपूर या उत्सवात सहभागी होऊ शकली नाही. त्यामुळे करीना तिला या गेटटुगेदरमध्ये मिस करत असल्याचं या पोस्टमध्ये लिहीते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Family lunch ️️ Miss you Lolo ️️

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

 

याआधी करीनाने राखी लंचच्या फोटोंआधी तैमुरचे काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये कुणाल खेमू आणि सोहा अली खानची मुलगी इनाया आणि तैमुर ही भावा बहिणीची क्युट जोडी सोबत दिसत आहेत. 

 

Recommended

Loading...
Share