By  
on  

आणि म्हणून बिग बींनी मागितली माफी, म्हणतात “मी चुकलो"

बिग बी अमिताभ बच्चन हे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असतात. चाहत्यांशी संवाद साधतात. अनेक कविता, मार्मित पोस्ट, देवी-देवतांना वंदन करणा-या पोस्ट त्यांच्या सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. अनेकदा नवा हुरुप, नवी प्रेरणा मिळण्यासाठी त्यांच्या या स्फूर्तीदायी पोस्टचा प्रत्येकालाच उपयोग होतो. पण नुकतंच अमिताभ बच्चन यांना सोशल मिडीयावर एक कविता पोस्ट केल्यानंतर माफी मागावी लागली आहे.  बिग बींनी  प्रसिद्ध कवी, लेखक प्रसून जोशी यांची चक्क माफी मागितली आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकार 

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन सध्या नानावटी रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहे. त्याला प्रेरणा देण्यासाठी बिग बींनी एक कविता पोस्ट केली, या कवितेचं क्रेडिट त्यांनी आपले वडिल कवी हरिवंश राय बच्चन यांना दिलं होतं. परंतु खरंतर ही कविता प्रसून जोशी यांनी लिहिली होती. बिग बींनी चुकून कवितेचं क्रेडिट प्रसून जोशींऐवजी आपल्या वडिलांना दिलं होतं. या चूकीसाठी बिग बींनी सोशल मिडीयावरुन जाहीर माफी मागितली

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive