By  
on  

रिया चक्रवर्तीने केला दावा, सुशांत सिंह राजपूतच्या फक्त या दोनच गोष्टी तिच्याकडे आहेत

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्ती काल ईडी कार्यालयात हजर होती. रियावर सुशांतच्या पैशांच्या अफरातफरीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तिची कसून चौकशी झाली. . ‘सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये’, अशी विनंती रियानं केली होती. परंतु, ईडीने रियाची ही विनंती फेटाळली आहे.

सुशांतची संपत्ती म्हणून माझ्याकडे फक्त दोनच गोष्टी आहेत, असा खुलासा रियाने केला. या दोन गोष्टी म्हणजे सुशांतने एका पानावर लिहिलेल्या काही ओळी आणि ‘छिछोरे’ असं नाव लिहिलेली त्याची पाण्याची बाटली, असं रियाने ईडीच्या अधिका-यांना सांगितल्याचं कळतं. 

 

 

सीबीआयने सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive