By  
on  

अभिनेता संजय दत्त लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल, Covid-19 टेस्ट निगेटिव्ह

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पण यात दिलासादायक बाब म्हणजे त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याची रॅपिड अ‍ॅंटीजेन टेस्ट केली गेली. त्यात ती निगेटिव्ह आली. 

 

संजय दत्तची प्रकृती स्थिर आहे. कदाचित आज त्याला डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचे कुटुंबिय पत्नी मान्यता आणि मुलं दुबईमध्ये आहेत. लॉकडाऊन असल्याने मान्यता इथे येऊ शकली नाही. संजयने काही दिवसांपुर्वीच पत्नी आणि मुलांचा फोटो पोस्ट केला होता. नुकताच अभिषेक बच्चनचा रिपोर्टही कोव्हिड निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यालाही डिस्चार्ज मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive