By  
on  

सोनू सुदचा सत्कार्यांचा धडाका सुरुच, आता केलं हे काम

लॉकडाऊनमध्येअभिनेता सोनू सुदने अनेक मजुरांना त्यांच्या गावी स्पेशल बस करून पाठवलं होतं. त्यामुळे सोनू सूद हा स्थलांतरित मजूरांचा देवदूत बनला . या कामासाठी सर्वत्रच त्याचं कौतुक झालं. देशभर त्याच्या कार्याचीच चर्चा सुरु होती. 
याशिवाय सोनूने काही गरीब कुटुंबांनाही मदतीचा हात दिला आहे.

 

पण आता सोनूने केलेल्या सत्कार्यामुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. पंजाबमध्ये एका कुटुंबातील आई-वडिल यांचं निधन झालं. या निधनानंतर चार मुलं पोरकी झाली. ही बातमी वर्तमानपत्रात वाचल्यावर सोनूने या मुलांना आधार देण्याचं ठरवलं आहे. या मुलांच्या शिक्षणाची तसेच पालनपोषणाची जबाबदारीही तो घेणार आहे. याकामी काही संस्थांचीही तो मदत घेताना दिसून येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive