अंकिता लोखंडेने शेअर केला जुळ्या बाळांसोबतचा फोटो, म्हणते, ‘आयुष्याची नवी सुरुवात’

By  
on  

अंकिता लोखंडे सध्या सुशांत प्रकरणामुळे चर्चेत आहेच. पण आता अंकिता सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमुळेही खास चर्चेत आहे. तिने जुळ्या बाळांसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. ही बाळं अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनची बहीण वर्षाची आहेत. 

 

 

या बाळांच्या जन्मानंतर अंकिता आनंदी झाली आहे. त्यांच्यासोबत फोटोही तिने शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अंकिता म्हणते, ‘ आमचं कुटुंब आनंदित आहे. नवीन आयुष्याची सुरुवात. आमचं घर या जुळ्यांच्या येण्याने भरून गेलं आहे. वेलकम अबीर अ‍ॅण्ड अबीरा. अंकिता आणि विकीने गेल्यावर्षीच त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. ही जोडी लग्न कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Recommended

Loading...
Share