धक्कादायक ! संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समोर

By  
on  

बॉलिवूडला लागलेलं कॅन्सरचं ग्रहण काही सुटता सुटेना. अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. प्रसिद्ध सिने समीक्षक कोमल नाहटा यांनी ट्वीट करत याची माहिती दिली. काही दिवसांपुर्वी संजय दत्त याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.  हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याची रॅपिड अ‍ॅंटीजेन टेस्ट केली गेली. त्यात ती निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला डिस्चार्जही दिला होता. पण या दरम्यान ही बातमी आल्याने खळबळ उडाली आहे.

पुढील उपचारासाठी संजय दत्त परदेशात रवाना होणार असल्याचंही कळतंय. 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share