संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर, पत्नी मान्यताने केली ही विनंती

By  
on  

बॉलिवूडला लागलेलं कॅन्सरचं ग्रहण सुटता सुटत नाहीय. नुकतंच अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचं धक्कादायक निदान झालं. पुढील उपचारासाठी तो परदेशात रवाना होणार आहे. संजय दत्तच्या या आजाराबद्दल पत्नी मान्यता दत्तने पत्रकाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. . “संजू लढवय्या आहे. आम्ही सर्वजण या परिस्थितीवर मात करुन विजेते म्हणून बाहेर पडू” असा विश्वास मान्यताने व्यक्त केला .

संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत असून देशभर तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. त्याला शुभेच्छा देणाऱ्यांचे मान्यता दत्तने आभार मानले आहेत. तसंच कुठल्याही प्रकारच्या अफवांना यादरम्यान बळी पडू नका असे तिने संजय दत्तच्या चाहत्यांना आवाहन केले आहे.

 

कामातून ब्रेक घेत आहोत असं संजयने सोशल मिडीयावर म्हटलं होतं. वैद्यकीय उपचारासाठी हा ब्रेक असून मी लवकरच परत येईन असंही संजय दत्तने स्पष्ट केलं. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याला शनिवारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं . तसंच त्याची करोना चाचणीसुध्दा निगेटिव्ह आली होती. परंतु काल मंगळवारी त्याला कॅन्सर असल्याचं स्पष्ट झालं.

Recommended

Loading...
Share