कारगिल गर्ल गुंजन सक्सेनाच्या मते, ‘जान्हवी कपूरच्या सिनेमात महिलांना संधी दिली गेली आहे

By  
on  

अगदी अलीकडेच भारतीय वायू दलाने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या सिनेमातील लिंग भेदभावावर आक्षेप घेतला होता. यानंतर ज्यांच्या जीवनावर हा सिनेमा बेतला आहे त्यानी आपला अनुभव शेअर करतानाच या बायोपिकची तुलना केली आहे. 
गुंजन म्हणतात, या बायोपिकचा मुळ आधारच IAF आहे. यामध्ये क्रिएटिव्हली माझी गोष्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही बाब नकारता येत नाही की सिनेमातही समान संधी दाखवली गेली आहे. आताही तिच समान संधी आहे. 

निळ्या आकाशात भरारी घेणं हेच गुंजन यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न भारतीय वायूसेनेच्या माध्यमातून पुर्ण झालं आहे. आसपास तितकंच सहकार्य करणारं वातावरण असणं गरजेचं आहे. मला माझ्या कुटुंबाकडूनही तितकाच सपोर्ट मिळाला. त्यानंतर IAF ज्यामुळे मी ही स्वप्न साकार करू शकले. गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला सिनेमा देशभक्ती वर आधारित आहेच पण लिंगभेदावरेही प्रकाश टाकतो. गुंजन जे मान्य करतात की कोणत्याही क्षेत्रात बदल होणं सोपं नाही. काही लोक तो सहज स्विकारतात काहींना वेळ लागतो. 

या सिनेमाबाबत IAFचे एक अनुभवी पायलट म्हणतात, ‘भलेही काही लोकांना बदलण्यास वेळ लागेल. पण बदल नक्कीच स्विकार्य आहे.’ धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडियोद्वारा बनवल्या गेलेल्या या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Recommended

Loading...
Share