By  
on  

शब्दांचे जादूगार गुलजार यांच्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव, अमृता खानविलकरनेही दिल्या शुभेच्छा

शब्दांचे जादूगार गुलजार यांच्या वाढदिवसानिमित्ताने सोशल मिडीयावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा देत आहेत. विशेषकरून सोशल मिडीयावर त्यांच्या शायरी पोस्ट करून, त्यांच्यासोबतचे फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही गुलजार यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुलजार यांची मुलगी मेघना गुलजार यांच्या राझी या सिनेमा अमृता झळकली होती. या सिनेमात अमृताची महत्त्वाची भूमिका होती. याच सिनेमाच्या लाँचला गुलजार यांनी हजेरी लावली होती. त्यादरम्यान काढलेला फोटो अमृताने इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे.

यासह अनेक कलाकारांनी गुलजार यांना 86व्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट केल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive