By  
on  

धकधक गर्ल माधुरीला मागील वर्षी शिकलेल्या या गोष्टीचा लॉकडाउनमध्ये झाला उपयोग

सौंदर्यवती, नृत्यांगना आणि बॉलिवुडची धकधक गर्ल माधुरीला नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. अभिनय आणि नृतकौशल्य असलेली माधुरीचा विविध गोष्टी शिकण्यात कायम कल असतो. 

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनच्या काळात माधुरीने घरात बसून कुकिंगही केलं आणि निरनिराळे पदार्थ बनवले. मागील वर्षी माधुरीने श्रीलंकन कुकिंगचे धडे घेतले होते. आणि त्याचाच उपयोग तिला लॉकडाउनमध्ये झाल्याचं माधुरी सांगते.

माधुरीने नुकतीच एक पोस्ट सोशल मिडीयावर केली आहे. मागच्या वर्षीचा हा फोटो असून माधुरी यात श्रीलंकन कुकिंग शिकताना दिसत आहे. ती या पोस्टमध्ये लिहीते की, "मागील वर्षी शिकलेल्या श्रीलंकन कुकिंग क्लासचा निश्चितच या लॉकडाउनमध्ये उपयोग झाला. तुम्हाला कोणती स्वयंपाकपद्धती आवडते ?"

 

असं लिहीत माधुरीने चाहत्यांनाही प्रश्न विचारला आहे. लॉकडाउनच्या काळात माधुरीने तिचं गायनकौशल्यही प्रेक्षकांसमोर आणलं आणि स्वत:चं 'कँडल' नावाचं गाणही प्रदर्शित केलं.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive