पाहा Video : हा आहे माधुरी दीक्षितच्या घरातला सगळ्यात छोटा सदस्य

By  
on  

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी विविध गोष्टी केल्या. या कालावधीत काही कलाकारांनी त्यांचं युट्यूब चॅनेलही सुरु केलं. लॉकडाउनच्या काळात माधुरीने तिचं गायनकौशल्य समोर आणलं. कँडल या नव्या अल्बमसह माधुरीचं गायनकौशल्य सगळ्यांना पाहायला मिळालं. 

 

धकधक गर्ल माधुरी दीक्षित आता तिच्या युट्यूब चॅनेलवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे माधुरीचे विविध व्हिडीओ या चॅनेलवर पाहायला मिळतात. नुकताच माधुरीने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत माधुरीने तिच्या परिवारातील सगळ्यात लहान सदस्याची भेट करून दिली आहे. हा सदस्य दुसरा तिसरा कुणी नसून तो आहे तिचा पेट डॉग कार्मेलो.

 

कार्मेलोला पहिल्यांदा कधी पाहिलं त्यापासून त्याला घरात कंस आणलं आणि तो कसा घरातला सदस्य बनला या सगळ्या गोष्टी माधुरी या व्हिडीओत सांगतेय. त्याच्यामुळे घरात कसं खेळतं वातावरणं असतं हे देखील माधुरी सांगतेय. 

Recommended

Loading...
Share