By  
on  

Sadak 2 Review:  आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूरच्या ‘सडक-2’ मधील बदल्याच्या कहाणीत थ्रिलरची कमतरता

फिल्म: सडक 2 
ओटीटी: डिज्नी प्लस हॉटस्टार
कलाकार: आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त
दिग्दर्शक : महेश भट्ट
रेटिंग:  2.5 मून्स
    
महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सडक 2’ हा सिनेमा एक बदल्याची कहाणी आहे. त्यांचाच 1991 मधील हिट सिनेमा ‘सडक’चा हा सिक्वल आहे. ज्यात एक टॅक्सिचालक रवि (संजय दत्त) आणि एक सेक्स वर्कर पूजा (पूजा भट) यांची प्रेमकथा होती. मात्र या सिक्वलमध्ये संजय दत्तसोबत आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूरदेखील आहेत. ज्यात प्रेम, बदला आणि विश्वासघाताचा प्रवास आहे. 
‘सडक 2’ ची कथा ही एका तरुण मुलीच्या भोवती फिरते, जिला आपल्या मित्रासोबत आणि एका अनोळकीच्या मदतीने एका ढोंगीचं सत्य समोर आणायचं असतं. हा सिनेमा भारतात असलेल्या काही खोट्या गुरुंचं वाईट सत्य समोर आणण्याचा प्रयत्त करते. सिनेमात आलियाची भूमिका ही कथेत येणारे ट्विस्ट आणि टर्नमुळे अनोळखी व्यक्तिच्या जिवंत राहण्याचं कारण बनतं.
‘सडक 2’ च्या कथेची सुरुवात ही रवि (संजय दत्त) पासून सुरु होते, जो एका टॅक्सीचालकाच्या भूमिकेत आहे. ज्याचं जगण्याचं कारण हे त्याची पत्नी पूजा (पूजा भट्ट) च्या मृत्यूनंतर संपून जातं. मात्र नंतर आर्या (आलिया भट्ट) च्या एन्ट्रीनंतर त्याला जाणीव होते की त्याला कुणासाठी जगायचं आहे ते.

आर्या आणि तिचा बॉयफ्रेंड विशाल (आदित्य रॉय कपूर) हे दोघं रविला एका रोड ट्रिपवर घेऊन जाण्यासाठी मनवतात. या ट्रिवमध्ये त्यांना आर्याच्या रागाचं खरं कारण कळतं जे विश्वासघाती बाबा ज्ञान प्रकाश (मकरंद देशपांडे) चा बदला घेण्याबाबतीत आहे, ज्याने तिच्या आईचा खून केलेला असतो.काही कालावधीतच आर्या ही रविसोबत वडिल-मुलीचं नातं बनवते, जो तिला या लढ्यात मदत करतो. मात्र जेव्हा दोघं विशालसोबत कैलास पर्वताच्या यात्रेसाठी निघतात तेव्हा गुरुच्या अवतारातील काही लोकं त्यांना मारण्यासाठी येतात.

हा सिनेमा भावनांसमवेत एका महत्त्वाच्या सामाजिक विषयाशी जोडलेला आहे. तरीही सिनेमाचा परिणाम इतका प्रभावशाली दिसत नाही. 2 तास 13 मिनीटांचा हा सिनेमा गोंधळात पाडणारा आहे. सिनेमात संजय दत्तने केलेल्या एक्शनचं कौतुक है मात्र त्यापलिकडे बाकी गोष्टी इतकी छाप सोडत नाहीत.

तर दुसरीकडे सिनेमातील एक्टर्सचे परफॉर्मन्स आणि त्यांचा अभिनय सिनेमाची ताकद आहेत. रविच्या रुपात संजय दत्त उत्तम वाटतोय आणि एका रियल हिरोच्या रुपात उठून दिसतोय. संजयचे काही सीन्स भावुक करणारे आहेत. शिवाय त्याचा अभिनयही सहज आणि चांगला वाटतोय. वडिल महेश भट्ट यांच्यासोबत पहिल्यांदा सिनेमा करणारी आलिया प्रत्येक फ्रेममध्ये कमाल वाटत आहे. तिचा जबरदस्त अभिनय आणि हावभावने तिने पुन्हा सगळ्यांची मनं जिंकली आहे. आदित्य रॉय कपूरनेही त्याच्या भूमिकेला न्याय दिला आहे. मात्र सिनेमात त्याची भूमी अपेक्षेपेक्षा कमी आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive