वडिल ऋषि कपूर यांच्या आठणीत भावुक झाली मुलगी रिध्दिमा कपूर साहनी, फोटो पोस्ट करून लिहीली ही भावुक पोस्ट

By  
on  

बॉलीवुडमधील दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांच्या जन्मदिवसानिमित्तान आज सोशल मिडीयावर त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. सगळ्यांनाच माहिती आहे की 30 एप्रिल 2020 रोजी मुंबईतील रुग्णालयात ऋषि कपूर यांनी शेवटचा श्वास घेतला होता. यातच आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुलगी रिध्दिमा कपूरने सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. रिध्दिमाने एक भावुक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रिध्दिमाने वडिल ऋषि कपूर यांच्यासोबतचे काही जुने फोटोही पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू तरळल्याशिवाय राहणार नाही.

पोस्ट शेयर करत रिध्दिमाने या भावुक पोस्टमध्ये असं कॅप्शन लिहीलं की, “पापा, असं म्हणतात की तुम्ही कुणाला गमावलं की तुम्ही त्यांच्याशिवाय राहू शकत नाही, आपलं ह्दय पूर्णपणे तुटून जातं. पण मला माहिती आहे की तुम्ही या तुटलेल्या ह्दयात राहत आहात आणि नेहमीच राहाल. मला माहिती आहे की, तुम्ही आम्हा सगळ्यांना पाहत आहात आणि हे बघत आहात की आम्ही तुम्ही दिलेल्या वैल्यू सिस्टम नुसार आम्ही जगतोय की नाही ते. तुम्ही मला दयेची भेट दिली, नातेसंबंधांच महत्त्वं दिलं आणि मला एक अशी व्यक्ति बनवलं जी मी आज आहे. मला तुमची रोज आठवण येते आणि मी नेहमीच तुमच्यावर प्रेम करत राहीन. आज आणि नेहमीच तुमचं आयुष्य सेलिब्रेट करू, वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
 वडिल ऋषि कपूर यांच्या निधनानंतर रिध्दिमा ही मुंबईत आई नीतू कपूर यांच्यासोबत राहत आहे. ऋषि कपूर यांच्या निधनानंतर सिनेविश्वात हळहळ व्यक्त करण्यात आली होती. 

Recommended

Loading...
Share