सुशांत सिंह राजपूत प्रकरण : 9 सप्टेंबर पर्यंत शौविक चक्रवर्ती आणि सैमुअल मिरांडाला एनसीबी कोठडी 

By  
on  

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा एक्स हाऊस मॅनेजर सैमुअल मिरांडाला 9 सप्टेंबर पर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे कोठडीसाठी पाठवण्यात आलं आहे. एनसीबीला या दोघांची 9 दिवसांसाठी कस्टडी पाहिजे आहे. मात्र शनिवारी मुंबई एक्सप्लेनेडनी दोघांना चार दिवसांच्या कोठडीसाठी पाठवलं आहे.
शुक्रवारी सकाळी ड्रग्स प्रकरणात एनसीबीने रियाच्या घरी छापा मारला होता. सैमुअल मिरांडाच्या घरी देखील एनसीबीची टीम पोहोचली होती. त्यानंतर शौविक आणि सौमुअलला नारकोटिक्स टीमने अटक केली. दोघांशी बरेच तास चौकशी करण्यात आली आणि शनिवारी त्यांना मुंबईच्या किला कोर्ट घेऊन जाण्यात आलं. जिथे त्यांना 4 दिवसांच्या कोठडीसाठी घेऊन जाण्यात आलं आहे.

छापा मारताना टीमने रियाच्या घरातील फर्नीचर, कपाट आणि मोबाईल फोन आणि इतर गॅजेट्सची तपासणी केली.. त्यासोबतच रिया आणि शौविक चक्रवर्ती च्या गाड्यांचीही तपासणी करण्यात आली. जवळपास 3.30 तास ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर एनसीबीची टीम शौविक आणि मिरांडा त्यांच्यासोबत चौकशीसाठी घेऊन गेली होती. 
दहा तासांच्या चौकशीनंतर शौविकला कायद्याच्या विभागानुसार शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो या प्रकरणात उद्या रिया चक्रवर्तीची देखील चौकशी करु शकतात. चौकशीसाठी एनसीबी आज रियाला समन्स पाठवू शकते.

Recommended

Loading...
Share